Type Here to Get Search Results !

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी : रोहित पाटील



माणदेश एक्सप्रेस न्यूज
प्रशांत केदार/सावळज :परतीच्या पावसामुळे राज्यासह तासगाव तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या असून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. तासगांव- कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख द्राक्षशेती उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या बिकट स्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शासनाकडे  केली आहे.तेंव्हा शेतकऱ्यांनी धीर धरावा.असा आत्मविश्वासदर्शक दिलासा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील  सावळजच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  दिलासा दिला.      
रोहित पाटील परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त  झालेल्या बागांचा पाहणी दौरा केला.यावेळी सावळजसह इतर गावातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पहाणी केली.
        या दौऱ्यात रोहित पाटील यांनी शशिकांत पाटील यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली.यावेळी अतिपर्जन्यवृष्टीमुळे बागेत  आलेल्या डाऊनी,फळकुज,करपा या रोगांच्या प्रादुर्भाव व  उपाययोजनाबाबत चर्चा केली. उपस्थितीत शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाची कैफियत मांडली.मोठी गुंतवणूक व प्रचंड कष्टाने  उभारलेल्या द्राक्षबागा अतिवृष्टीमुळे मातीमोल झाल्या . शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असतानाही प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत वेळ घालवीत आहे.शासनाने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई द्यावी.तसेच संपूर्ण कर्जमाफी देऊन अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना पुन्हा  उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.अशा भावना रोहित पाटील यांनी या पहाणी दौऱ्यात  व्यक्त केल्या. 
     तमाम शेतकरी  बांधवांना दिलासा देत या अडचणीच्या काळात आम्ही आपल्या सोबत आहोत. हताश होवु नका. शक्य ती सगळी मदत मिळवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू. असे आश्वासन यावेळी रोहित पाटील यांनी दिले.
यावेळी शशिकांत पाटील, मिलिंद पोळ,सोहम पाटील,संजय पाटील,सिध्द्नाथ जाधव,बाळासाहेब पोळ,ऋषीकेश पाटील,रवींद्र मगदूम,विजय चव्हाण,तुषार पोळ,सचिन पाटील यांच्यासह अनेक द्राक्षबाग शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies