पात्रेवाडीत एकाची आत्महत्या. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 28, 2019

पात्रेवाडीत एकाची आत्महत्या.माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : वल्लभ सदाशिव पाटील (वय. 27)  रा. पात्रेवाडी या तरुणाने काल सकाळी साडेनऊ वाजता एका शेतकऱ्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गावच्या पोलीस पाटील पुष्पात नवनाथ गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वल्लभ सदाशिव पाटील याचे उच्च शिक्षणही झाले होते. तो काही दिवस गलाई  व्यवसाय निमित्त बाहेर होता. अलीकडे तो गावी आला होता. काल सकाळी साडेनऊ वाजता त्याने संपतराव पवार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise