Type Here to Get Search Results !

आटपाडी संविधान जनजगृतीचे गाव: आजपर्यंत हजारो संविधान पुस्तिका वाटप; फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांचा उपक्रम.



माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. याच आटपाडीत 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान संविधान जनजागृती सप्ताह आयोजित केला जाते. राज्यात कुठेही सात दिवसांचा संविधान जनजागृती  सप्ताह घेतला जात नाही. केवळ आटपाडीतील फुले शाहू आंबेडकर विचारमंचाकडून संविधान सप्ताह व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे विचारमंचचे ५ वे वर्ष होते. यावेळी २० ला मुंबईचे सहाय्यक आयकर आयुक्त सचिन मोटे साहेब यांचे हस्ते सुरुवात सुरुवात तर 26  नोव्हेंबरला कॉ. धनाजी जाधव यांच्या उपस्थित समारोप झाला. 
इतिहास काळापासून गावागावात ज्ञानेश्वरी पारायणाचे सप्ताह आयोजित केले जाते. याच धर्तीवर देशाचे कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, या प्रबोधन  हेतूने राजेंद्र खरात फुले शाहू आंबेडकर विचारमंचाच्या वतीने गेली पाच वर्षांपासून संविधान जनजागृती सप्ताह व्याख्यानमाला घेत आहेत. आटपाडीतील राजारामबापू विद्यालयाच्या पटांगणात सायं. 6 ते 9 वेळेत घेतला जातो. सप्ताहाची सुरुवात 20  नोंहेबर रोजी संविधान ग्रंथदिंडीने होते. गावातुन ग्रंथदिंडी फिरविली जाते. सप्ताहात संविधान व संविधानाशी निगडित विषयावर सहा दिवस सहा वेगवेगळे वक्ते प्रबोधन करतात. वक्त्यांना कोणतेही पुष्पगुच्छ न देता संविधानाची पुस्तिका भेट देऊन त्यांचे स्वागत सत्कार केला जातो. मान्यवरांसह श्रोत्यांनाही लहान स्वरूपातील संविधान पुस्तकेचे वाटप केले जाते. हजारो नागरिकांना संविधानाचे पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. श्रोत्यांना कार्यक्रम झाल्यावर स्नेहभोजन असते.
संविधान जनजागृती व्याख्यानमाला उपक्रमाअंतर्गत आटपाडीतील घराघरात संविधान पुस्तिका पोहचली आहे. त्यामुळे  संपूर्ण आटपाडी संविधानमय झाली आहे. गेल्या पाच वर्षात 30 हुन अधिक वक्त्यांनी हजारो नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संविधानाबद्दल मोठी जनजागृती झाली आहे. यामध्ये पाच वर्षात  मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, दीपा श्रीवस्ती, डॉ.सुषमाताई अंधारे, अमोल मिटकरी, प्रा.गौतमीपुत्र कांबळे, ए.बी.पी.माझाचे संपादक राजीव खांडेकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार लक्ष्मण माने वैशालीताई डोळस, डॉ.भालबा विभूते अशा अनेक विचारवंत वक्त्यांनी आपले विचार सप्ताहातून मांडले आहेत. त्यामुळे हजारो लोकांमध्ये संविधानाबद्दल जागृती झाली आहे.राज्यातील विविध सामाजिक संघटना विचारवंत, समाजसुधारक यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. 
सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र खरात, उपाध्यक्ष लक्ष्मण मोटे (साहेब) सचिव सुरेश मोटे, दै. माणदेश एक्सप्रेसचे संपादक दिपक प्रक्षाळे, रणजित ऐवळे, धीरज प्रक्षाळे, विशाल काटे हे नेहमीच भरीव योगदान दे असतात. तसेच समाजातील विविध दानशूर व्यक्तींचा हातभार असतो. प्रशासनानेही अशा प्रबोधन कार्याची दखल घेत कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्यावतीने संविधान जनजगृती सप्ताह घेतो. कार्यक्रमासाठी समाजातून अनेकांची मदत होते. या उपक्रमातून संविधानाबाबतची माहिती लोकांना मिळते. समाज जागृती होते. देशहिताचे कार्य आम्ही करीत आहोत. यासाठी इतरांनीही पुढे यावे.
राजेंद्र खरात 
अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर विचारमंच आटपाडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies