Type Here to Get Search Results !

सायकल चालवा, पेट्रोल वाचवा ; व्यायामामुळे सायकल विक्री वाढली आटपाडी शहरात महिन्याला सरासरी १०० ते १५० सायकलची विक्री



माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/बिपीन देशपांडे :  पेट्रोल दरात सारखी होणारी दरवाढ आणि व्यायामासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही सायकलची मागणी वाढली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य जंकफूड, फास्टफूड आहारी जाऊन त्याची बैठी जीवनशैली बनली असून व्यायामाचा अभावमुळे याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून व्याधींना निमंत्रण देत आहे. आजच्या फिटनेस च्या जमान्यात पेट्रोल वाडीचा खर्च परवडत नसल्याने युवक, वयोवृद्ध सायकलला पसंती देत आहेत. त्यामुळे शहरात सायकल खरेदी जोमाने सुरू आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिक सायकलचा वापर करतात. सायकल चालविण्याने  शरीरातील नसानसा चा व्यायाम होत असून रक्ताभिसरण वाढते. स्नायू पेशी मजबूत होतात. आरोग्य उत्तम राहते व होणारे प्रदूषण कमी होते. पूर्वी फक्त गरिबांचे वाहन म्हणून सायकल ओळखले जायची. आता उच्चभ्रु लोकांकडे सायकल दिसत आहे. सायकल चालवण्यात शाळकरी विद्यार्थी, दूध विक्रेते, पेपर विक्रेते मागे राहिले नाहीत. 
आटपाडी शहरातील शहरातील आकाश सायकल मार्ट चे पवार बंधू यांची  दुसरी  पिढी या व्यवसायात असून ते म्हणाले की, महिन्याला सरासरी पंधरा ते वीस सायकली विक्री होत असून कमी खर्चात फिटनेससाठी ग्राहकांचा कल खरेदीकडे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा मोर्चा सायकलकडे वळविला असून पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी शरीराला सायकल उपयुक्त असून सध्याच्या परिस्थितीत सायकल व्यवसायाला पुन्हा तेजी येणार आहे.


सायकल ही पर्यावरणपूर्वक अशी वाहतुकीसाठी योग्य आहे. सायकल चालविण्यामुळे शरीराच्या सर्व भागांचा व्यायाम होतो. तसेच इंधन दरवाढीवर सायकल सर्वोत्तम  उपाय होवू शकतो.  
संजय काळेल सर
सदस्य श्री सायकल, क्लब 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies