Type Here to Get Search Results !

पुणे विभागीय आयुक्त यांचा सन्मान



माणदेश एक्सप्रेस न्युज 
 म्हसवड/अहमद मुल्ला : ऑगस्ट महिन्यात कोल्हापूरसह विविध जिल्ह्यात आलेला महापूर व नुकतीच झालेली अतिवृष्टी या कालावधीत अतिउत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे विभागीय महसूल आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा नुकताच पुणे येथे बैठकीदरम्यान सन्मान करण्यात आला. 
 पुणे येथील कौन्सिल हॉल येथे जनता दरबार व पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते या निमित्ताने पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य प्रा. विश्वंभर बाबर यांनी पुष्पगुच्छ देऊन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा सन्मान केला. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात महापुरांमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यांच्यावरील तातडीची उपाययोजना या निमित्ताने महसूल यंत्रणेने सतर्क राहून उत्कृष्ट काम केले. नुकतीच झालेली अतिवृष्टी त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान याबाबत महसूल आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी विविध जिल्ह्यात भेटी देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला व पिक नुकसान पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले. पुणे विभागीय महसूल यंत्रणेने केलेल्या सतर्क कामाचा गौरव म्हणून प्रा.विश्वंभर  बाबर यांनी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा सन्मान करून संपूर्ण यंत्रणेच्या कार्याचा गौरव केला यावेळी डॉ. विनायक आगाशे व विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies