Type Here to Get Search Results !

किरकोळ कारणावरून नळाचा पाईप घातला डोक्यात



माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : कंपनीमध्ये चिड का केलीच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संतोष दशरथ कोळी (वय-१९) रा. क्रांती नगर झोपडपट्टी, अमराई, सोलापूर यांची आरोपी नरसिंग गार्लेपल्ली, दीपक गार्लेपल्ली, बसू गार्लेपल्ली, आकाश गार्लेपल्ली सर्व रा. अमराई, अंबिका मंदिराजवळ सोलापूर या सगळ्यांनी मिळून फिर्यादी संतोष कोळी यांची कंपनीमध्ये चीड काढली. याच कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तसेच त्यानंतर दीपक गार्लेपल्ली याने लहानसा नळाचा पाईप डोक्यात घातला व संतोष याला जखमी करून तू केस केली तर तुला जीवे मारू अशी धमकीही दिली. 
ही घटना १० नोव्हेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटील वस्ती, अर्जुन कॅन्टींग समोर घडली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सय्यद हे करीत आहेत.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies