Type Here to Get Search Results !

श्रीराम ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी तायक्वांदो स्पर्धेमध्ये राज्यात दुसरा


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी :श्रीराम बहुउद्देशीय  सेवाभावी संस्था आटपाडी संचलित श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी मधील विद्यार्थी कु.हर्शवर्धन अनिल सागर इ.12 वी (कला) याने  दि.3, 4, व 5 आक्टोंबर 2019 या कालावधीत गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो मध्ये 19 वर्श वयोगटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून (सिल्वर मेडल) प्राप्त केले. या यषाबदद्ल संस्थेचे अध्यक्ष श्री.तानाजीराव पाटील व सचिव श्री.षिवाजीराव पाटील, व प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देवून सत्कार करण्यात आला. याबरोबरच क्रांतीसिह नाना पाटील लोक विद्यापीठ विटा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेमध्ये इ.12 वीचे  विद्यार्थी कु.प्रथमेष प्रफुल्ल भिंगे यांने प्रथम क्रमांक पटकविला तर विष्वजित आनंदराव ऐवळे यांने द्वितीय क्रमांक मिळविला यांचाही सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील म्हणाले  कु.हर्शवर्धन सागर यांनी तायक्वांदो स्पर्धेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवून श्रीराम ज्युनिअर कॉलेजने  नेत्रदीपक असे यश  मिळवून दिले आहे. कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनी  त्याचा आदर्श  घेवून शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय  पातळीवर यश  संपादीत करावे असे अहवान केले. याप्रसंगी  श्रीराम ज्युनिअर कॉलेजमधील क्रिडा शिक्षक प्रा.आप्पा हातेकर, प्रा.सुजित सपाटे, इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies