Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्याचा आमदार झाला पाहिजे ; अमरसिंह (बापू) देशमुख यांनी तालुकावासियांना केले आवाहन ; आटपाडी येथील जवळे हॉल येथे उद्या दि. ३ रोजी सकाळी १०.३० ला उपस्थित रहा


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आमदार झाला पाहिजे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी उद्या दि. ३ रोजी सकाळी १०.३० वा. जवळे मल्टीपर्पज हॉल येथे येण्याचे आवाहन आटपाडी तालुक्याचे नेते अमरसिंहबापू देशमुख यांनी केले आहे.

यावेळी बोलताना अमरसिंहबापू देशमुख म्हणाले, आटपाडी तालुक्याचा उमेदवार असावा, प्रत्येकवेळी आटपाडी तालुक्याला का गृहीत धरावे? मागील वेळीस जर तालुक्यातून एक उमेदवार असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता यश मिळाले असते अशी तालुक्यातील लोकांची अपेक्षा होती.
आटपाडी तालुक्यावर अन्याय होत असून जर तालुक्याचा आमदार झाला तर सध्या सुरु असलेल्या टेंभू व उरमोडी योजनेचे पाणी या योजनांना गती येईल. तालुक्यातील शेतकरी यांना पैसे भरून हि पाणी मिळत नाही याच्याउलट मात्र तासगाव, पलूस मिरज येथील शेतकरी यांना मात्र पाणी पैसे न भरता मिळते. कारण तेथील लोकप्रतिनिधींनी भूमिका कणखर घेतली होती. 
सत्ता असल्यावर काय करता येते हे मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना पहिले आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना आटपाडी तालुक्याचा आमदार व्हावे असे वाटत अशा सर्व तालुक्यातील नागरिकांनी, नेत्यांनी उद्या दि. ३ रोजी सकाळी १०.३० वा. आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल येथे यावे असे आवाहन अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies