Type Here to Get Search Results !

माळशिरस विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर मैदानात


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यातील  चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंचायत समिती माळशिरस चे माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील त्यांनी जाहीर केलेली असल्याने उत्तमराव जानकर गटामध्ये व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून लोकसभेच्या वेळेला मोहिते-पाटील आणि विरोधी गट एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काही कार्यकर्त्यांच्या समवेत खिंड लढवली होती. त्यामध्ये 43 हजाराच्या आसपास मताधिक्य राष्ट्रवादीला मिळालेले होते. एक लाखाच्या वर खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना माळशिरस मधून लीड मिळालेले होते. त्यामध्ये उत्तमराव जानकर गटाचा सिंहाचा वाटा होता. आता उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली असल्याने उत्तमराव जानकर गट आणि मूळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट यांचे मताचे आकडेवाडी पाहता आजच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यास काहीही अडचण राहणार नाही.
माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गटाची ताकद निश्चितपणे एक झाल्यानंतर विजय खेचून आणल्या येवढी ताकत होणार आहे. त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उत्तमराव जानकर यांच्यासारखा लढवय्या नेता अनेक संघर्षातून पुढे आलेला आणि मोहिते-पाटील यांना शह देण्याकरता शरद पवारसाहेब यांना चांगला हिरा सापडला. त्यामुळे उत्तमराव जानकर यांची राष्ट्रवादीची उमेदवारी म्हणजे माळशिरस तालुक्याला दुग्धशर्करा योग समजला जात आहे. निश्चित पणाने एक दिलाने एक मनाने माळशिरस विधानसभेतील उमेदवार पवारसाहेबांच्या विचाराचा विजयी होईल असा आशावाद माळशिरस तालुक्यांमध्ये निर्माण झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies