Type Here to Get Search Results !

आटपाडी येथे दि. १६ रोजी प्रकाश आंबडेकर यांची जाहीर सभा : साहेबराव चंदनशिवे

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी :  वंचित बहुजन आघाडीचे खानापूर मतदार संघातील उमेदवार श्रावणदादा वाक्षे यांच्या प्रचारार्थ आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन मैदान येथे येथे दि. १६ रोजी दु. २.०० वा. वंचितचे नेते प्रकाश आंबडेकर यांची जाहीर सभा आयोजित केली असल्याची माहिती भारिपचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदार संघात ७८ हजार मतदान झाले होते. त्यामुळे मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्रावणदादा वाक्षे हे उच्चशिक्षित असून त्यांना मतदार संघाचा विकास करण्याची धमक त्यांच्यात आहेत. मतदार संघात पाणी सोडले तर अजून हि मुलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. वीज, रस्ते, शिक्षण याबाबत अजूनही सुधारणा झालेली नाही. हे सगळे बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्रावणदादा वाक्षे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा दि. १६ रोजी दु. २.०० आयोजित केली असून सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारिपचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies