Type Here to Get Search Results !

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विजयगंगा प्रकल्पापाचा शुभारंभ संपन्न


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथे विजयगंगा जल संवर्धन  भांब ते तिरवंडी नावीन्यपूर्ण नाला खोलीकरण लोकअभियान प्रकल्पाचे  उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज मदनसिंह  मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा तालुकाध्यक्ष सोपानराव नारनवर, लक्ष्मण पवार, संजय मोटे, संगीता मोटे यांच्या हस्ते संपन्न झाला.
माळशिरस तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासू पाऊस कमी पडत असल्याने अनियमित पावसामुळे निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी भांब ते तिरवंडी नाविन्यपूर्ण नाला खोलीकरण जलशक्ती लोकअभियानाला माळशिरस तालुक्यातुन चांगला प्रतिसाद मिळणार आहे. तालुक्यातील सर्वावात लांब ओढा भांब ते तिरवंडी २८ किलोमीटर लांबीचा आहे. हा ओढा करणे गरजेचे आहे यामध्ये ८ गावांचा समावेश केलेला आहे. हे काम तीन टप्यात केले जाणार तसेच प्रथम टप्यात भांब ते कन्हेर या गावातून जाणार्याू ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण 2 गावातील ओढ्याची लांबी १० किमी एवढी आहे.  दुसऱ्या टप्प्यात इस्लामपूर, जाधववाडी, भांबुर्डी तसेच येळीव या गावांचा समावेश आहे. या ओढ्याची लांबी १० कि मी एवढी आहे. तिसऱ्या टप्प्यात मेडद व तिरवंडी या ओढ्याची लांबी ८ कि मी आहे. या प्रकल्पासाठी शासनाच्या दराने ९ कोटी ४० लाख एवढी लागते. परंतु अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी लोक चळवळ उभी करून अनेक सामाजिक संस्था, साई फाउंडेशन व दानशूर व्यक्ती यांचेकडून मशनरी व आर्थिक मदत उभा करून हे काम ३ कोटी रकमेत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. भांब ते कण्हेर या गावातुन जाणाऱ्या ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी 99 लाख रुपयाची शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. सदर नाला खोलीकरण काम केल्यानंतर 37 हजार स.घ. मी. पाणीसाठा उपलब्ध  होणार आहे. या साठ्यामुळे  ६ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे याचा फायदा परिसरातील सर्वांनाच होणार आहे. यावेळी गणपतराव वाघमोडे, बाळासाहेब सरगर, लेखा व वित्त विभाग महेश अवताडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मदनसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्यात  लेखा जोखा मांडत प्रत्येक युवकाने बचत केली पाहीजे, बचत गटाच्या माध्यमातुन महिलांच्या हाताला काम मिळेल लोकसहभागातुन सार्वजनिक हिताची  कामे केली पाहीजे, पुर्वी कोल्हापूरी टाईपचे साखळी बंधारे होते त्या बंधाऱ्याची देखभाल दुरूस्थी करुन घेण्यास सांगत, डीप.सी.सी, नाला बंडिंग, शौचखड्डे, सिमेंट बंधारे बांधल्यामुळे बऱ्यापैकी पाणी आडवता येऊ लागले. परंतु गेली दोन तीन वर्ष सतत पडत असलेला दुष्काळ पाऊसाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्कार करण्यापेक्षा  वृक्ष लागवड केली पाहिजे त्याचे संगोपन केले पाहीजे  तर आपल्या वर पाऊसाची कृपा होईल असे मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले. 
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज मदनसिंह  मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, सर्जेराव दराडे, लेखा वित्त विभाग महेश अवताडे, विनायक खरात, सरपंच सविता बर्वे, गणपतराव वाघमोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा तालुकाध्यक्ष सोपानराव नारनवर, लक्ष्मण पवार, संजय मोटे, संगीता मोटे, रावसाहेब देशमुख, प्रताप पाटील, मंगलताई वाघमोडे, हेमलता चांडोले, सुनंदा फुले, राहुल वाघमोडे, आबा पाटील, शंकराव भानवसे, माणिकराव कर्णवर, सुरेश मोहिते, सुनील माने, गणेश पाटील, बाळासाहेब वावरे, स्वप्निल शहा सह तालुक्यातून विविध भागातून आलेले शेतकरी व ग्रामस्थ तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी केले तर आभार लक्ष्मण पवार यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies