Type Here to Get Search Results !

संधी मिळाल्यास माळशिरस विधानसभा लढविणार-राजाभाऊ सरवदे : कारुंडेत रिपाई चा कार्यकर्ता मेळावा संपन्न


माणदेश एक्सप्रेस न्युज 
नातेपुते/प्रमोद शिंदे :  संधी मिळाल्यास माळशिरस विधानसभा लढविणार असल्याचे मत रिपाईचे राज्य सचिव तथ महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) राजाभाऊ सरवदे यांनी कारुंडे ता, माळशिरस येथे रिपाई कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
कारुंडे येथे राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुका गाव भेटी दौऱ्याचे आयोजन केले होते, या दौऱ्याचा सांगता समारोप कारंडे येथे झाला, हा दौरा पंढरपूर पासून वेळापूर, माळशिरस, पुरंदावडे, सदाशिवनगर, नातेपुते असा होता. समारोप दरम्यान राजाभाऊ सरवदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेसाठी रिपाइंने चार जागा मागितल्या आहेत. अक्कलकोट, माढा, माळशिरस व मोहोळ या जागांची मागणी केली आहे. माळशिरस हा राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघावर जास्त लक्ष आहे आणि ही जागा रिपाई लाच सुटेल अशी आशा आहे. नाम. आठवले साहेब आदेश देतील त्याप्रमाणे निवडणुकीचे काम करणार आहोत. जर मला संधी मिळाली तर मी सुद्धा माळशिरस मधून निवडणूक लढू शकतो.
या कार्यक्रमास रिपाईचे जेष्ठ नेते आबासाहेब देठंणकर, कुमार गायकवाड, राज्य कार्यकारीचे अनेक नेते उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्ह्याचे सोमनाथ भोसले, विकास धाईंजे, विशाल साळवे व अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात राजाभाऊ सरवदे माळशिरस विधानसभा लढवावी ही मागणी केली. यावेळी गावचे सरपंच अमर जगताप, हनुमंत पाटील, किरण धाईंजे, मिलिंद सरतापे, रवि गायकवाड, एस.एम. गायकवाड, गणेश गायकवाड, विशाल गायकवाड, मारुती खांडेकर, रणजीत सातपुते, विजय गायकवाड, विनोद रणदिवे, सचिन सरोदे, तसेच सोलापूर, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सरतापे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies