Type Here to Get Search Results !

माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तर संयोजक प्रमुख म्हणून पांडुरंग वाघमोडे यांची निवड


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी म्हणून खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची तर माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे यांची संयोजक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती पांडुरंग वाघमोडे यांनी दिली. यानिवडी विधानसभा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, महसुलमंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने यानिवडी करण्यात आल्या आहेत. ८ सप्टेंबर रोजी पुणे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रतील सर्व संयोजक व प्रभारी यांना येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रभारी व संयोजक यांची जबाबदारी सांगण्यात आली व बहुमताने निवडणुका जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी गिरीष बापट, सुभाष देशमुख, सगटनमंत्री विजय पुराणिक, आ.योगेश टिळेकर, माजी मंत्री आमदार दिलीप कांबळे,  खा. अमर साबळे, मंञी बाळा बेगडे, आ.माधुरीताई मिसाळ, खा.जयसिध्देश्वर स्वामी, शहाजी पवार, अविनाश कोळी आदि उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies