Type Here to Get Search Results !

शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य अखंडित चालू ठेवावे : नितीन दोशी ; शिक्षक दिनानिमित्त सरस्वती विद्यालयास दिली पुस्तके भेट


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड येथील सरस्वती विद्यालयास अहिंसा पतसंस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी बोलताना पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हणाले की, सरस्वती विद्यालय अल्पावधीत नावारूपास आले असून विद्यालयास ग्रंथालयाची गरज ओळखून विध्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी अहिंसा पतसंस्थेच्या वतीने पुस्तकांची भेट देण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या विद्यालयातील शिक्षकांनी शाळा नावारूपास आणली आहे. पालकांनी मोठ्या विश्वासाने शिक्षकांकडे मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना सोपविले असते ती जबाबदारी शिक्षकांनी ओळखून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावेत व शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य अखंडित करावे. 
नितिन दोशी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजगे यांनी प्रास्ताविक करून सर्वाचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक महावीर व्होरा, अनिल देशमाने, कर्मचारी बाबू मुल्ला, नितीन वाडेकर, अमजद मुजावर, विद्यालयाच्या प्रमुख सौ शेटे मॅडम उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies