Type Here to Get Search Results !

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना एकरी २ लाख रु. नुकसान भरपाई द्या : शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सांगील जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरयांच्या डाळिंब बागांचे तेलकट (बिब्या) रोगामुळे प्रंचड नुकसान झाले असून संपूर्ण डाळिंब बागा उध्वस्त झाल्या असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना एकरी २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
सांगली जल्ह्यातील डाळिंब शेतकरी मोठ्या कष्टाने डाळिंब बागेचे संगोपन करीत असून ऐन दुष्काळात टँकरने पाणी देवून सदरच्या बागा जपण्याचा प्रयत्न करतात. परंतु अलीकडे तेलकट (बिब्या) रोगाची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून प्रचंड नुकसानीमुळे कर्जबाजारी झाला आहे. त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. 
दुष्काळी पट्यातील शेतकऱ्यांच्या बागेचे नुकसान प्रचंड झाले आहे. त्यामुळे शासनाकडून एकरी २ लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी हरिदास लेंगरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
यावेळी शिवसेना नेते बजरंग (भाऊ) पाटील, भारत होनमाने, हात्तीकर सर, अशोक सर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शासन दरबारी शेतकऱ्यांच्या मागण्या पाठवून देवू असे जिल्हाधिकारी म्हणाले असल्याचे हरिदास लेंगरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies