Type Here to Get Search Results !

दिघंची येथे राष्ट्रवादीचा दि. २० रोजी कार्यकर्ता मेळावा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती; हणमंतराव देशमुख यांची माहिती


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिघंची येथे कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव (आप्पा) देशमुख यांनी दिली आहे.
विधानसभेच्या दृष्टीने मेळाव्यास महत्व प्राप्त झाले असून या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. सदरचा मेळावा हा सिद्धिविनायक कोल्ड स्टोरेज दिघंची येथील मैदानावर शुक्रवार येथे दि. २० रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हणमंतराव देशमुख यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies