Type Here to Get Search Results !

२५ तोळे सोन्यासाठी नातूनेच कट रचून केले आजोबाला ठार; नातू आणि आजोबाच्या नात्याला काळीमा फासणारी शिंदेवाडी (नातेपुते) येथील घटना; पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा; २४ तासात आरोपी गजाआड


माणदेश एक्सप्रेस न्युज 
नातेपुते/प्रमोद शिंदे : २५ तोळे सोन्यासाठी नातवानेच कट रचून आजोबाला ठार केल्याची घटना शिंदेवाडी ता. माळशिरस जि, सोलापूर येथे घडली असून नातू आणि आजोबाच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. सदर प्रकरण तपास पोलिसांनी गतीने करत आरोपींना २४ तासाच्या आत गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी की, नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 288/2019 भादवि कलम 302, 397, 34  प्रमाणे गून्हा दाखल झाला असुन गुन्हयातील फिर्यादी प्रसाद दिलीप शिंदे  वय २५ व्यवसाय शिक्षण  रा. शिंदेवस्ती, शिंदेवाडी ता.माळशिरस  जि. सोलापूर  हा दि. १७/९/१९  रोजी  रात्री १२.३० ते ०१.00 वा  दरम्यान लघुशंकेसाठी बाहेर गेला असताना चार अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी प्रसाद शिंदेच्या राहते घरजवळ येवून त्यापैकी दोन अनोळखी इसमापैकी एक टि शर्ट घातलेल्या इसमाने पाठीमागून फिर्यादीच्या मानेवर चाकू लावून तू गप्प बस असे म्हणून त्यास धाक दाखवून खाली बसवले व इतर दोन अनोळखी इसमानी फिर्यादीचे आजोबा भगवान जगदेवराव शिंदे याचे खोलीत जावून त्याचे दोरीने हात पाय बांधून त्यांना जीवे ठार मारून खोलीतील लोखंडी कपाट व लॉकर उघडून त्यातील 1) 1,00000  /-  रू 5 तोळे सोन्याच्या बांगडया 2) 1,20,000 /- रू 6 तोळे सोन्याच्या पाटल्या 3) 80,000 /-रू 4 तोळयाचे सोन्याचे गठण 4) 1,60,000 /- रू 8 तोळयाचे सोन्याचे लाकीट 5) 40,000 /-रू 2 तोळयाचे सोन्याच्या अंगठया असे एकूण 5,00000 /-रूपयाचे 25 तोळयाचे सोन्याचे वरील दागिणे  जबरीने चोरून नेले आहे असे फिर्याद दाखल होती. 


सदर गुन्हयाचा तपास करीत असताना मनोज पाटील पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यानी गून्हयाच्या घटनास्थळी भेट देवून तपासाच्या अनूषंगाने महत्वाचे सूचना दिल्या. गुन्हयाचा तपास करीत असताना बातमी दारा मार्फत काही गोपनीय माहीती घेवून महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने यातील फिर्यादी याचे मित्र 1) सागर छबूराव रणनवरे वय 29 वर्ष रा. शिंदेनगर ता.फलटण 2) दत्तात्रय सिताराम देशमुख वय 35 वर्ष  रा. शिंदेवाडी ता. माळशिरस या दोघाना ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यानी सांगितले की फिर्यादी प्रसाद दिलीप शिंदे हा व्यवसाय करीत असताना त्यात तो कर्जबाजारी झाला होता ते पैसे देण्यासाठी प्रसाद दिलीप शिंदे यानी मयत आजोबा भगवान जगदेवराव शिंदे याचेकडे काही पैशांची मागणी केली होती. त्यानी  पैसे न दिल्याने मयत भगवान जगदेवराव शिंदे याचेकडे पैसे सोने असल्याचे प्रसाद दिलीप शिंदे यानी सांगितले नंतर फिर्यादी याचे मित्र सागर छबूराव रणनवरे, दत्तात्रय सिताराम देशमुख व फिर्यादी प्रसाद दिलीप शिंदे यांनी कट रचून आजोबास हात पाय बाधून तोडात बोळा घालून पैसे आणि सोन्याचे दागिने चोरून नेवून जीवे ठार मारले आहे असे सागून गून्हयाची कबूली दिली आहे. सदर गून्हयाचा अधिक तपास सपोनि यूवराज खाडे, नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहेत. 
सदरचा गून्हा हा मा मनोज पाटील पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू याचे मार्गदर्शनाखाली सपोनि यूवराज खाडे नातेपुते पोलीस ठाणे, सफौ राजाराम शिंदे, पोहेकॉ अनिल गडदे, पोहेकॉ असलम काझी, पोना शिवकुमार मदभावी, सिद्राम कंटोळी, पोकॉ निवृत्ती करांडे, पोकॉ राकेश लोहार, पोकॉ संदीप भोते व डी.वाय.एस.पी पथकामधील पोहेकॉ श्रीकांत निकम, विकी घाडगे, समीर पठाण, विशाल घाडगे, कडाळे, पोकॉ अन्वर आतार, पोना बबलू गाडे यांनी  तपास करून गून्हा २४  तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणल्याने जनतेमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies