Type Here to Get Search Results !

तासगाव-कवठेमहांकाळ मधून आरपीआयच्या सिमा आठवले रिंगणात : महिला मेळाव्यात केली घोषणा


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सौ. सिमा आठवले लढविणार आहेत. तशी घोषणा नुकतीच सौ. सिमा आठवले यांनी महिला मेळाव्यात केली.
तासगाव मतदारसंघ आबांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमून पाटील यांनी निवडणूक लढवत विजय सुद्धा मिळवला. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून पुन्हा सुमून पाटील यांची उमेदवारी निश्चित समजले जाते. तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगावमधून भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र आता आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी सुद्धा तासगावमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली आहे. महिला मेळाव्यात बोलताना, तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, अशी ग्वाही देखील सीमा आठवले यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies