Type Here to Get Search Results !

माडगुळे येथे शारदीय नवरात्र उत्सव वास उत्साहाच्या वातावरणात सुर्वात



नंदकुमार विभुते / माडगुळे : माडगुळे येथे आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली.  माडगुळे गावात जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ व ग. दि .माडगूळकर नवरात्र उत्सव मंडळ या दोन्ही मंडळाने श्री क्षेत्र तुळजापूर व करवीर नगरी कोल्हापूर या दोन ठिकाणाहून ज्योत आणली दोन्ही मंडळाच्या ज्योतीचे गावात आग्मन होताच तरुणाईच्या उत्साहात पारावार उरला नाही. फटाक्याच्या नयनरम्य आतषबाजीने व हलगीच्या तालावर तरुण वर्ग बेधुंद होता. गावात संपूर्ण वातावरण आनंदमय होऊन गेले,  संपूर्ण गावातील सर्व रस्ते सडा-रांगोळी कडून स्वगत करण्यात आले होते.  दोन्ही मंडळातील देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून नवरात्री मधील मनोरंजनाचे कार्यक्रम रात्री दहा वाजण्याच्या आत  बंद व्हावेतयाउद्देशाने सर्व कार्यक्रमचे नियोजन केले आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. अशी माहिती  मंडळातील कार्यकर्त्यांनी दिली आहे. गावात मंडळाकडून नऊ दिवस भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विजयादशमी दिवशी मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies