माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : वंचित बहुजन आघाडीचे
महासचिव गोपीचंद पडळकर यांनी आज मुंबई मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवेशावेळी बोलताना गोपीचंद पडळकर
म्हणाले, भाजप सरकारने धनगर आरक्षण बाबत
न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती
लागू केल्या असल्याने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.
तर प्रवेशावेळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीचंद
पडळकर हे वंचित आघाडीत जाण्यापूर्वी त्यांचे मन वळवण्याचा मी प्रयत्न केला परंतु
त्यात यश आले नाही,. आता
मात्र ते भाजपात आल्याने मला आनंद झालेला आहे. भाजप प्रवेशावेळी आरक्षण सोडून
गोपीचंद यांनी कोणतीही राजकीय मागणी केली नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्या
समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.