Type Here to Get Search Results !

अकोला येथे दि. 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 62 वा वर्धापन दिनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा : राजेंद्र खरात


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 62 वा वर्धापन दिन येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी अकोला येथील  क्रिकेट क्लबच्या मैदानात साजरा करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने रिपाईच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाईचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी करण्यात आली. येत्या 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 62 वा वर्धापन दिन आहे. रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन महोत्सव म्हणून रिपाइं तर्फे दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्याचे ठिकाण अकोला जिल्हा निवडण्यात आले असून रिपाइं च्या अकोला जिल्हा कमिटीतर्फे रिपाइं च्या 62 व्या वर्धापन दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइं च्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. तसेच या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) राजा सरवदे, रिपाइं महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, दिपकभाऊ निकाळजे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष त्र्यंबक शिरसाट आणि आयोजक रिपाइं चे अकोला जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे आहेत. तरी रिपब्लिकन पक्षाच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला येथे आयोजित कार्यक्रमास आटपाडी तालुक्यातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies