Type Here to Get Search Results !

कडकनाथ घटाळ्याचे लोण माळशिरस तालुक्यात; गोरडवाडी येथील शेतकरी तरुणांना घातला ३९ लाखांचा गंडा; रयत ऍग्रो इंडिया कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा माळशिरस येथे दाखल

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे :  माळशिरस गोरडवाडीडकनाथ कोंबडी घोटाळ्याचे लोन माळशिरस तालुक्यात पसरले आहे. कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणाच लोण माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीत  पोहचला आहे. येथील युवकांची ३९ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल झाली असून कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सागर गोरड यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, दिलेल्या फिर्यादीवरुन रयत अॅग्रो इंडीया इस्लामपूर जिल्हा सांगली या कंपनीचे सुधीर मोहीते, विजय शेंडे, संदीप मोहिते, हणुमंत मोहीते सर्व रा. इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की, सागर गोरड यांचा शेतीपुरक कुकुटपालनाचा व्यवसाय आहे. सदर कंपनीची कडकनाथ कोंबडीपालनाची जाहिरात टिव्हीवर पाहिल्या नंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने कडकनाथ कोंबडीचे भरघोस उत्पादन असल्याचे सांगितले. तसेच कंपनीने कोंबडीची अंडी देणे, कोंबड्या घेणे, लाईट, पाणी, शेड, संगोपनाची व्यवस्था करुन तयार झालेल्या कोंबड्या खरेदी करणार असल्याचे सांगितले. 
गोरडवाडीतील युवकांनी पै पै पैसा जमा करून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कडकनाथ कोंबडीचे भरघोस उत्पादन मिळत असल्याचे कंपनीने सांगितल्यामुळे युवकांनी शेतीवर कर्ज काढून हात उसेन पैसे घेऊन पोल्ट्री शेड बांधले.  कोंबडीचे एक अंडे पन्नास रुपयाला घेऊ त्यामुळे अनेक तरुण रयत  ऍग्रो कंपनीला जोडला गेला. आपल्या व्यवसायाला चालना मिळणार म्हणून त्यांनी या कंपनीला १५ लोकांनी नोटरी करुन दिली. परंतु कंपनीने शर्ती व अटीचा भंग केला म्हणुन पैसे मागण्यास गेलो असता तेथून हाकलुन दिले. 
या कंपनीमध्ये आबा गोरड ३ लाख ७५ हजार, सुभाष गोरड ३ लाख ७५ हजार, ज्ञानदेव कोकरे २ लाख 10 हजार, कुंडलीक कोकरे २ लाख 10 हजार, आप्पा गोरड १ लाख ५० हजार, चंद्रकांत गोरड १ लाख ५० हजार, बिरा गोरड १ लाख ५० हजार, तानाजी गोरड २ लाख पन्नास हजार, नवनाथ गोरड २ लाख पन्नास हजार, साहेबराव शेंडगे ४ लाख ८० हजार, युवराज वळकुंदे, २ लाख २० हजार, महादेव चव्हाण २ लाख ४० हजार, शिवाजी सुळे, ६० हजार, नुरमहंमद २ लाख, अशी फसवणुक झाल्याची फिर्याद कंपनीचे सुधीर मोहिते, विजय शेंडे, संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे सर्व रा. इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या विरोधात माळशिरस पोलिसात दाखल झाली असुन, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies