Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात आरपीआयला गळती सुरू : तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे यांनी दिला राजीनामा: भाजप उमेदवाराचे काम न करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांचा दबाव वाढला

सांगली जिल्ह्यात आरपीआयला गळती सुरू
तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे यांनी दिला राजीनामा
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव/वार्ताहर: सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवाराचे काम न करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांचा दबाव वाढत गेल्याने तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण झेंडे यांनी राजीनामा दिला असून जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे व प्रभारी जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून सांगली जिल्हा आरपीआय मध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. सांगली जिल्हा आरपीआय मध्ये कार्यकर्ते कमी व नेते अधिक झाले असून सध्या पक्षाला दोन-दोन जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षाचा जिल्ह्यांमध्ये जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच नगरपलिका सदस्य नाहीत. परंतु ग्रामपंचायत सदस्य सुद्धा दुर्बिणीतून शोधावे लागतील. जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे  जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. परंतु त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली व निवडून आले. त्यामुळे पक्षाचे प्रभारी पद कडेगावच्या महादेव होवाळ यांच्याकडे होते. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत विट्याचे बाबासाहेब कांबळे व जतचे संजय कांबळे जे पुर्वी आरपीआय च्या प.महाराष्ट्र विभागात काम करत होते ते वरून खाली आले व त्यांना विभागून जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. यावर नगरसेवक असणारे जगन्नाथ ठोकळे नाराज होवून त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिरजमध्ये आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला त्या मेळाव्याला बोटावर मोजण्याइतपतच कार्यकर्ते होते.

खासदार संजयकाका पाटील यांच्या अडचणीत वाढ वाचा सविस्तर 

परंतु तासगाव मध्ये याउलट घडले असल्याने भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचे काम करायचे नाही यासाठी तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे यांच्यावर दबाव वाढत गेल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला असून ते कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies