Type Here to Get Search Results !

कडेगाव येथे टँकर पलटी होऊन चालक ठार

कडेगाव येथे टँकर पलटी होऊन चालक ठार
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव येथे कँनालवरून पाण्याचा टँकर निघाला असता डावीकडील रस्ताच्या मुरुम खचल्याने  टँकर पलटी होऊन चालक मौसा गुलाब सनदी (वय६०) रा. सांगली हे या अपघातात ठार झाले. कडेगाव येथील डोंगराई देवीच्या पायथ्याशी व सागरेश्वर सूतगिरणीचे वरचे बाजूला  शिवशक्ती कंस्ट्रक्शनचे कँनाल अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. या अस्तरीकरणावर पाणी मारण्याचे काम टँकरने सुरु होते.
यावेळी कँनालचा डावीकडील मुरुम खचल्याने टँकर पलटी झाला.  या अपघातात टँकरचालक मौसा  सनदी हे ठार झाले. हा अपघात सकाळी ११ च्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद कंपनी सुपरवाझर  सुभाष मल्हारी अंधारी यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सपोनि शिदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies