Type Here to Get Search Results !

सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीनीना दुर्गा चँरिटेबल ट्रस्ट पुणे तर्फे शिष्यवृत्ती मंजूर

सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीनीना दुर्गा चँरिटेबल ट्रस्ट पुणे तर्फे शिष्यवृत्ती मंजूर
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला: येथील सिद्धनाथ हायस्कूल मधील कु.अल्फिया रहिम काझी व कु.माया सदाशिव वायदंडे या इ.९वी मधील विद्यार्थीनी ज्ञानमित्र शिष्यवृत्तीस पात्र झाल्या.
दुर्गा चँरिटेबल ट्रस्ट पूणे मार्फत गोंदावले येथे घेण्यात आलेल्या ज्ञानमित्र शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड मधिल  अल्फिया काझी व माया वायदंडे यांनी यश प्राप्त केले व त्या इ.९ वी व १० वी करीता ज्ञानमित्र शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अरुण काकडे यांनी प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी उपप्राचार्य अशोक शिंदे,पर्यवेक्षक तानाजी गावडे, अहमद मुल्ला, विजयकुमार भागवत, प्रविण भोते, महादेव नलवडे  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies