Type Here to Get Search Results !

माडगुळे येथे वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले : 70 हजार रुपयांच्या आसपास नुकसान


माडगुळे येथे वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
माडगुळे/नंदकुमार विभुते : माडगूळे येथे काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बाळासो ईश्वरा मंडले यांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने जवळपास 70 हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माडगुळे येथे काल अचानकपणे संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अति जोराच्या वादळी वाऱ्यामुळे ‍मंडले यांच्या घराचे छत ऊडुन गेले. भिंतीला तडे गेले व त्यात संसारोपयोगी साहित्य, धान्य,टीव्ही संच, भांडी, कपडे, असा एकूण 70 हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मंडले यांनी वरील माहिती दिली. मंडले यांचे कुटुंब  गरीब आहे. ते आपले जीवन गरिबीत जगत आहे. सध्या गावात काही काम नसल्या कारणाने हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ऊस तोडीस गेले होते. ते दोन दिवसापूर्वी ऊसतोड संपून आपल्या गावाकडे आले होते. कसातरी आपला जीवनाचा गाडा चालवित असताना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास त्यांना भाग पडले.
अठराविश्व  दारिद्र्यात हे कुटुंब जीवन जगत आहे. सध्या त्यांनी उघड्यावरच आपला संसार थाटला आहे. या कुटुंबियास शासकीय मदतीची नितांत गरज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies