Type Here to Get Search Results !

माढ्यातून दौलतनाना शितोळे अपक्ष लढणार : दहीगाव येथील बैठकीत केले जाहीर.

माढ्यातून दौलतनाना शितोळे अपक्ष लढणार
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
नातेपुते/प्रमोद शिंदे : सध्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा सुरू असताना आणखी एक नवीन चेहरा समोर आला आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक, रामोशी समाजाचे युवानेते दौलतनाना शितोळे ,हे माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं आज दहीगाव येथील बैठकीत त्यांनी जाहीर केले.
पुढे ते म्हणाले की, अनेक वर्षापासून रामोशी  समाज मागास आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने त्याची दखल घेतली नाही. रामोशी समाजाचे या मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त मतदान आहे, तरीसुद्धा येथे एकही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य झालेला नाही. सामाजिक व राजकीयदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. एस.टी आरक्षणाचाही प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी आम्ही
निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितले.
या बैठकीस दौलतनाना शितोळे, बबन खोमणे, गजानन जाधव, अजित शिरतोडे, सुनील चव्हाण, सचिन बुधावले,विजय धनवडे,जाधव सर, खटावचे माजी सभापती जाधव साहेब, नानासो मदने,डॉक्टर
थोरात, रामदास खोमणे तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारणी,जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष अजित शिरतोड़े यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies