Type Here to Get Search Results !

पूर्वीपासूनच मी राष्ट्रवादी विचारांचा : संजयमामा शिंदे: माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव याठिकाणी सदिच्छा भेट

पूर्वीपासूनच मी राष्ट्रवादी विचारांचा : संजयमामा शिंदे
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
नातेपुते/प्रमोद शिंदे : पूर्वीपासूनच मी राष्ट्रवादी व पवार साहेबांच्या विचारांचा होतो, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजयमामा शिंदे यांनी उंबरे दहिगाव येथे केले. उमेदवारी जाहीर केल्यावर ते पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव याठिकाणी सदिच्छा भेट देण्यास आले होते.
ते म्हणाले की, मी विकासाच्या मुद्यावरती निवडणूक लढवणार असून जनता माझ्या पाठीशी आहे. पूर्वीपासून मी राष्ट्रवादीचा आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात वरिष्ठ नेत्यांच्या चुकांमुळे मी थोडा लांब थांबलो होतो. परंतु आता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करणार आहे. तसेच जनतेचे  काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करणार असून, यापुढे जनतेची कामे मी करणार आहे. तसेच त्यांनी फोंडशिरस परिसरात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.  ग्रामस्थांच्यावतीने संजयमामा शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भानुदास पाटील, विवेक गवळी, संजयमामा शिंदे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता ढेकळे, महेश पवार, शामराव देशमुख, ज्ञानदेव वाघमोडे, दीपक ढेकळे,सोपान वाघमोडे,मधुकर ठोंबरे,रामभाऊ गोरे,दादासो पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies