Type Here to Get Search Results !

दहिवडी महाविद्यालयात प्रथमच पदवीदान समारंभ

माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/अहमद मुल्ला : पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमात उत्तीर्ण झालेल्या आणि २०१८-१९ मध्ये पदवीप्राप्तीसाठी अर्ज केलेल्या दहिवडी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा पदवीदान समारंभ १५ मार्चला दहिवडी कॉलेजमध्ये होत आहे. यापुर्वी पदवीदान समारंभ फक्त विद्यापीठाच्या पातळीवर होत असे त्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यानाच विद्यापीठात पदविचे वितरण होत असे. शिवाय विद़्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास पदवी पाहुण्यांच्या हस्ते मिळू शकत नव्हती म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही पदवी या वर्षापासून विद्यालयस्तरावर मिळावी यासाठी महाविद्यालयातच या समारंभाचे आयोजन करण्याचा उपक्रम विद्यापीठाने सुरु केला आहे. त्यानुसार दहिवडी महाविद्यालयात हा समारंभ १५ मार्च रोजी होत आहे.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ़. भाऊसाहेब कराळे हे असुन विशेष मार्गदर्शक व विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी जाधव हे आहेत. या समारंभासाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यानी शिवाजी विद्यापीठाकडे दिक्षांत समारंभाचे अर्ज भरलेले असतील त्यांनी या समारंभात सकाळी ११ वाजता उपस्थित राहून पदवी स्विकारावी असे आवाहन परीक्षा विभाग प्रमुख डॉ़. ए.जे.बरकडे आणी उपप्राचार्य डॉ़. बी.एस. बलवंत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies