Type Here to Get Search Results !

गुणवंत शाळेचा व यशवंत व्यक्तिमत्वांचा शिक्षक समितीकडून गौरव : शैक्षणिक उठाव, विविध नवोपक्रम, सुशोभित शालेय परिसर, वृक्षारोपण, बोलक्या भिंती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षक, पालक व बालक असा सुयोग्य संगम साधणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेवाडीने नावलौकिक


गुणवंत शाळेचा व यशवंत व्यक्तिमत्वांचा शिक्षक समितीकडून गौरव 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: विद्या हेची धन, राबती गुरुजन, म्हणूनच होई गुणवंतांचा सन्मान या उक्तीप्रमाणे आटपाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेवाडी यांनी इयत्ता पहिली ते चौथी गटात स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविलेबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शितल रास्ते, उपशिक्षक दत्तात्रय सुतार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापुसो हाके ,शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे दत्तात्रय पाटील (पंच), मार्गदर्शक म्हणून काम पाहणाऱ्या केंद्रप्रमुख कमलकाकी गायकवाड आदींचा यथोचित गुणगौरव आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला.
शैक्षणिक उठाव, विविध नवोपक्रम, सुशोभित शालेय परिसर, वृक्षारोपण, बोलक्या भिंती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षक, पालक व बालक असा सुयोग्य संगम साधणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेवाडीने नावलौकिक मिळवलेला आहे. २०१८/१९ या सालात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमात या शाळेने तालुक्याचा नावलौकीक  वाढविला असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव यांनी सत्कार सोहळ्यानंतर केले. यावेळी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड, विभाग सचिव दीपक कुंभार, शिक्षक नेते रमेश चव्हाण, संजय कबीर, भास्करराव डिगोळे, विठ्ठलपंत माळी, सत्यवान माने, अजय राक्षे, श्रीकांत कुंभार, रतीलाल गळवे, सुभाष सुतार, पांडुरंग ऐवळे, नामदेवराव अनुसे,  हैबतराव पावणे, बाळासो साळुंखे, दरीबा बजबळकर, रवींद्र सावंत, सर्जेराव कुरणे, महिला आघाडीच्या वैशाली राक्षे, अनिता जाधव, रेश्माबी आत्तार, गायत्री चांडवले, कल्पना बनसोडे, सुरेखा मंडले, अंजली बडे  आदींसह इतर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies