Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे रणजितदादा भाजपच्या वाटेवर?,भाजपचे मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट


राष्ट्रवादीचे रणजितदादा भाजपच्या वाटेवर? भाजपचे मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट
नातेपुते/प्रमोद शिंदे: माजी खाजदार रणजितसिंह मोहिते-पाटील उर्फ रणजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव भाजपच्या वटेवर आसल्याची चर्चा सोशल मिडीयतुन होत आहे. पुर्वी पासुनच अशी चर्चा होती की, मोहिते-पाटील घराने भाजपच्या संपर्कात आहे. मध्यांतर भाजपचे मंत्री सुरेश प्रभु  अकलुजला कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा चर्चा रंगली होती. आता सुध्दा रणजितसिंह मोहीते-पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले आहेत त्या ठिकाणी पक्ष प्रवेश व उमेदवारी संदर्भात चर्चा झाली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रणजितसिंह मोहीते-पाटील यांचे माढ्या मध्ये चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे मोहिते-पाटील कोणत्याही पक्षात गेले तरी त्याचे कार्यकर्ते त्याच्या पाठीशी उभे राहतात. तसेच स्थानिक उमेदवार म्हणुन याचा फायदा रणजितसिंह यांना होऊ शकतो. माढ्यातील राजकीय वर्तुळे दररोज बदलताना दिसत आहे. 
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी रणजितसिंहांना भाजपने माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे सोलापूरमधील मंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्तीने भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता रणजितसिंहांनी गिरीश महाजनांची घेतलेल्या भेटीमुळे याला पुष्टी मिळताना दिसत असून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून तसे झाल्यास माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढणार हे स्पष्ट दिसत आसल्याची चिन्ह दिसत आहेत.
जर मोहिते –पाटील भाजप मध्ये गेले तर राष्ट्रवादीला मोठा फटका बसनार आहे. माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे व मोहिते-पटील हे एकमेव हुकमी एक्का आसल्याच मानल जाते आहे. परंतु हा एक्का भाजपच्या हातात जाणार की काय? हे येणारी वेळच ठरवेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies