Type Here to Get Search Results !

जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये निर्माण करावी: डॉ. नितीन वाघमोडे : वस्त्यांवरून चालत शाळेला येणाऱ्या मुलांना १६ सायकलचे वितरण

बनगरवाडी येथील आदर्श जनता विद्यालयातील मुलींना सायकलचे वितरण करताना डॉ. नितीन वाघमोडे, सिद्धार्थ तोरणे, मधुकर ढोले, बी.के. काटकर आदी मान्यवर

जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये निर्माण करावी: डॉ. नितीन वाघमोडे
वस्त्यांवरून चालत शाळेला येणाऱ्या मुलांना १६ सायकलचे वितरण
माणदेश एक्सप्रेस न्युज
वरकुटे-मलवडी/वार्ताहर: विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण ती काळाची खरी गरज आहे. त्याबरोबरच शाळेने आजपर्यंत दिलेले आचारविचार, केलेले संस्कार,  देऊ केलेली सकारात्मक दृष्टी, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा अशी समृद्ध शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला पाहिजे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे नक्की ठरवून त्याचे नियोजन करून पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येईल. असे मत मुंबईचे अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केले.  बनगरवाडी ता. माण येथील आदर्श जनता विद्यालय येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक मधुकर ढोले, बी.के. काटकर, महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, पोलीस पाटील शहाजी बनगर, माजी सरपंच भारत अनुसे, वैभव शिंगाडे, सुरेश बनगर ,बापुराव बनगर, सचिन होनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लांब पल्ल्याच्या वस्त्यावरून चालत शाळेला येणाऱ्या मुला-मुलींसाठी डॉ.नितिन वाघमोडे आणि एस बालन ग्रुप पुणे यांच्या माध्यमातुन १६ सायकलचे वितरण करण्यात आले. तर नुकतेच सैन्यात भरती झालेले नीलेश ढेरे याचा डॉ. नितीन वाघमोडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुलवामा येथील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी चेअरमन वस्ताद ढेरे ,माजी सरपंच प्रल्हाद अनुसे, अनिल बनगर, डी.जी.बनगर, मुख्याध्यापक तोरणे, भालेकर, लुबाळ, सजगणे, विकास शिंगाडे, अनिल बनगर आदी बनगरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies