Type Here to Get Search Results !

महाड ते मुंबई पदयात्रा ऐतिहासिक ठरणार : डॉ.तुकाराम ठवरे : मोर्चा महाराष्ट्रातील सर्वात एैतिहासिक मोर्चा ठरणार

महाड ते मुंबई पदयात्रा ऐतिहासिक ठरणार : डॉ.तुकाराम ठवरे
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तमराव जानकर व गोपिचंदजी पडळकर यांनी पुकारलेल्या अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा अंतिम टप्पा म्हणून महाड ते मुंबई ही पदयात्रा जाहिर केली असून, हा धडक मोर्चा महाराष्ट्रातील सर्वात एैतिहासिक मोर्चा ठरणार असून या मोर्चामध्ये राज्यातील धनगर व सर्व बहुजन समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खुडूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी केले.
महाड चवदार तळे येथून सदर पदयात्रा व धडक मोर्चाची बुधवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून सुरुवात होईल, यावेळी अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा यांचे प्रणेते उत्तमरावजी जानकर व  गोपिचंदजी पडळकर यांचेसह समाजाचे  सर्व आजी-माजी मंत्री,खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व सर्व सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी यांचे सह लाखो समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
महाड येथून सदर धडक मोर्चा कळंबोली, कामोठेपर्यंत पोहचेल व तेथून लाखोंचा जनसमुदाय पदयात्रेस सुरूवात करेल व पहिला मुक्काम नेरूळ येथे होईल. दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक २८ फेब्रुवारी राजी पुन्हा महामोर्चास सुरूवात होऊन दुसरा मुक्काम परेल, सोमय्या ग्राउंड या  ठिकाणी होईल. शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी हा महामोर्चा मुंबईच्या दिशेने जाईल व दुपारी १ वाजता विधानभवनावर स्वारी करेल. यावेळी सदर धडक महामोर्चा विराट रूप दाखवेल. अंदाजे २० ते २५ लाखाहुन अधिक  समाजबांधवासह बहूजन समाजबांधव सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सदर धडक महामोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, अधिकारी, कर्मचारी, बहुजन समाजबांधव, युवक मित्र यांचे सह गोपिचंद पडळकर, उत्तमराव जानकर, सोशल मिडीया मंच महाराष्ट्र राज्य यांचे  पदाधिकारी विशेष योगदान देत असुन, महाराष्ट्रातील या भव्यदिव्य अशा ऐतिहासिक न भूतो न भविष्यती, अश्या धडक महामोर्चास महाराष्ट्रातील धनगर व बहुजन समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक महामोर्चाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन डॉ. तुकाराम ठवरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies