Type Here to Get Search Results !

पिरळे सरपंचपदी सौ. सुवर्णा सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड

पिरळे सरपंचपदी सौ. सुवर्णा सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
नातेपुते/प्रमोद शिंदे : पिरळे ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड नुकतीच पार पडली. सरपंच पदी सौ.सुवर्णा मोहन (रवी) सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्यासप्रमाणे दुसऱ्या उमेदवाराला ही जनसेवेची संधी मिळावी म्हणुन आहिल्या दत्ता रुपनवर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला व एकमताने सौ. सुवर्णा मोहन सुर्यवंशी यांची खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच गणेश सारळवे, ग्रा.पं.सदस्य दशरथ जाधव, बापु बुधावले,विद्याराणी प्रल्हाद किर्दक, वैशाली ज्ञानदेव शिंदे, विद्या दशरथ लवटे, लता भिमराव दडस, आहिल्यादेवी दत्ता रुपनवर, रंजना पांडुरंग खिलारे तसेच मंडल आधिकारी सुळ, तलाठी कपील मसलखांब,ग्रामसेवक रमेश जमदाडे, कर्मचारी विश्वास बनकर, सुरेश खिलारे, माणीक खिलारे मान्यवर उपस्थीत होते. निवड झालेवर गुलाल व फटाके उडवुन जल्लोष करण्यात आला.
यावेळी नुतन सरपंच बोलताना म्हणाल्या की, जनतेच्यासेवे साठी कटिबद्ध राहू तसेच पंचायत समिती माळशिरस सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, रणजितसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies