Type Here to Get Search Results !

मी शिवसेनेचा जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता होतो आहे व निष्ठावंतच राहणार- गणेश रसाळ

गणेश रसाळ 

मी शिवसेनेचा जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता होतो आहे व निष्ठावंतच राहणार- गणेश रसाळ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला: आज तालुक्यात शिवसेनेचे किती अस्तित्व आहे ते सर्वांना माहित आहे. गणेश रसाळ असताना शिवसेना काय होती? तालुक्यात शिवसेनेचा काय दबदबा होता? हे लोकांना माहित आहे. तरी नाहक एक गट तयार झाला आहे. त्यांना गणेश रसाळ नको, निष्ठावंत कार्यकर्ता नको, आपल्याला मनमानी करता येती, राजकिय पक्षाला बांधिल होता येते, पाहिजे तसे वागता येते. या केवळ उद्देशाने गणेश रसाळ यांना विरोध करणे हा एकमेव कार्यक्रम काही जणांनी एकत्रीत येऊन सुरु केला असल्याचे गणेश रसाळ यांनी सांगिलते. योग्य वेळी सर्व शिवसैनिक, वरिष्ठ नेते एकत्र येऊन संबधितांची कानउघडणी करतीलच, मी त्याविषयी काही बोलण्याची गरज नाही. 
नुकतीच शिवेसना तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अवमान केल्याबद्दल त्यांचा जाहीर केल्याचे प्रसिद्धीपत्रक दिले होते याबाबत गणेश रसाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी ते म्हणाले, मी शिवसेनेचा जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता असून शिवसेना जिल्हा प्रमुखाने म्हसवड शहरात येऊन म्हसवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना सुद्धा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या हस्ते प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन व्हावे, शिवसेनेचा एक चांगला संदेश लोकांपर्यंत जावा म्हणून हा घेतलेला निर्णय होता. परंतू काही शिवसैनिकांना जे कुठे-कुठे राजकिय बांधिल आहेत त्यांना हा चांगला उपक्रम स्तुत्य उपक्रम पचणी पडलेला नाही. यावरुन हे सिद्ध होतं की, या लोकांना शिवसेना वाढवायची आहे का नाही? पदावर राहुन जे पक्षाची गद्दारी करतात त्याच्यांकडे वरिष्ठानी लक्ष देणे गरजेचे आहे. शिवसेना वाढीसाठी शिवसेना मजबुतीसाठी सगळ्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन वरिष्टांच्या कानावर घालून नगरपालिका लढवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात मी एकट्याने निवडणूक लढलो नाही. तर पाटण, महाबळेश्वर, वडूज मध्ये काय झालं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता गणेश रसाळ आपल्याला त्रासाचा होतो आहे. भविष्यात त्याला केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने अशा पद्धतीचे खोटारडे आरोप केले जात असल्याचे ही गणेश रसाळ यांनी सांगितले. 

सर्व जिल्हा प्रमुखाना मातोश्रीवरुन आदेश आहेत की आपआपल्या जिल्ह्यातील सर्व जुने नवे  शिवसेना कार्यकर्ते एकत्रित करुन संघटना जोमाने उभी करणे. आणी त्यानुसार सर्व कार्यकर्त्याना एकत्र करण्याचे हे काम जोमाने सुरु आहे.
गणेश रसाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies