Type Here to Get Search Results !

पै. सौरभ नरूटे कुमार केसरीचा मानकरी

पै.सौरभ नरूटे
पै. सौरभ नरूटे कुमार केसरीचा मानकरी
 माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे :  तरंगफळ (ता.माळशिरस) येथील पै.सौरभ नरूटे या छोट्या कुस्तीमल्लाने मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पंचवीस किलो वजनीगटात कुमार केसरीचा किताब पटकाविला आहे. सध्या तो खुडूस येथील वस्ताद महादेव ठवरे यांच्या कुस्ती केंद्रात सराव करीत आहे.
तालुक्याच्या सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, सगळीकडे त्याचे कौतुक केले जात आहे. कुस्तीच्या पहिल्या राउंडमध्ये प्रथमेश गायकवाड याला चितपट करून, दुसऱ्या डावात विजय मस्के यांस  10-2 ने पराभूत केले. तिसऱ्या डावात पवन घोडके यास 14-4 ने पराभूत केले. तर अंतिम डावात त्याने संकेत चव्हाणला चितपट करून तो कुमार केसरीचा मानकरी ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies