Type Here to Get Search Results !

गदिमा स्मारकास रोहित पवार व रोहित पाटील यांची सदिच्छा भेट

गदिमा स्मारकास रोहित पवार व रोहित पाटील यांची सदिच्छा भेट
 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  शेटफळे (ता.आटपाडी)  जि. सांगली येथील महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकीकार, गीतरामायणकार, महाकवी ग.दि. माडगुळकर यांच्या शेटफळे येथील स्मारकास इंडियन शुगर मिल्सचे अध्यक्ष युवा नेते रोहितदादा पवार व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी गदिमा स्मारकास सदिच्छा भेट देवून पाहणी केली. यावेळी शेटफळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे सचिव किशोरबापू गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी रोहित हणमंतराव देशमुख, विठ्ठल गायकवाड, श्रीकांत(बंडू) गायकवाड, बाळूकाका विठ्ठल गायकवाड, आलम कांबळे यांच्यासह शेटफळे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रोहित पवार यांनी शेटफळे येथील ग्रामस्थ व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies