दिस आल्यात कस हो रांगड! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

दिस आल्यात कस हो रांगड!


दिस आल्यात कस हो रांगड!
 राज्यकर्ते गब्बरगंड, मेंढपाळ-पशुपालक,शेतकरी उपलानी,आता पाणी तरळतय फक्त डोळ्यातच, 
माण तालुक्यातील स्थिती
माणदेश एक्सप्रेस न्यूज:अहमद मुल्ला/म्हसवडदुष्काळी माण तालुक्यात यंदाचा दुष्काळ १९७२च्या दुष्काळापेक्षा भयंकर होणार असुन १९७२चा दुष्काळ हा अन्न-धान्याचा होता. त्यावेळी पाण्याची कमतरता नव्हती. यावर्षी पावसाने दडी मारल्याने चार महिण्यापासून तालुक्यात पाण्याचे टँकर सुरु आहेत, पाऊस पडला नसल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाची पेरणीच झाली नाही.  त्यामुळे यंदाचा दुष्काळ हा अन्न ,धान्य ,पाणी व चारा या चार संकटाचा असुन दिवाळीवरही दुष्काळाचे सावट फिरले आहे. पाणी नाही प्यायला, खायाला नाही अन्न ,जनावरांना नाही चारा अशी अवस्था  तालुक्यातील बहुतांश गावात झाली असुन लोक ऊसतोडीला गेल्याने गावे ओस पडली आहेत. ऐन दिवाळीत बाजारपेठा ओस पडल्या होत्या. तालुक्यातील सर्व पाणी योजना बंद झाल्या आसुन म्हसवडची एकमेव पाणी योजना सुरु असल्याने म्हसवडच्या पाणी योजनेवर तालुक्याचा भार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
  ऐन  पावसाळ्यात माण तालुक्यात कडक उन्हाळ्याचे दिवस पहावयास माणवासियांच्या नशिबी आले आहेत. कायमस्वरूपी पाण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून दाखवून राजकारण्यानी निवडणुकीत सत्ता मिळवली. सत्तेतुन पैसा कमवून गब्बरगंड झालेल्या राजकारण्यानी माणवासियांच्या डोळ्यातील पाणीही पळवले, तर दुसरीकडे पावसाने आखडता हात घेवून दोन्ही हंगामाच्या पेरणीतील बाजरी, ज्वारी, गहुही हाताला लागले नाहीत. त्यामुळे सोळाशे ते आठराशे रुपये शेराने मिळणारी ज्वारी तेवीसशे रुपयावर गेली. तर बाराशेपर्यंत असणारी बाजरी आज बावीसशे ते तेवीसशे रुपयेपर्यंत, कधी आला नाही ऐवढा दर बाजरीला आला आहे. ९५ ते १०० % टक्के शिवारे पाउस नसल्याने ओसाड पडली आहेत. तर दहिवडी, गोंदवले, बिदाल,शिंगणापूर आदी भागातील पाणी योजना दोन महिण्यापासून बंद पडल्याने या गावासह अनेक गावात पाणीटंचाई असतानाही  पंचायत समिती ,तहसील कार्यालय व प्रांताधिकारी टँकर प्रस्तावाचे कागदी घोडे नाचवून पाणी टंचाई असलेल्या गावाना राजकारण्याच्या ईशाऱ्यावर नाचवून पाण्याचेही राजकारण करण्याचे डोहाळे लागलेल्या राजकरण्यानी राजकारण बाजुला ठेवून १९७२ पेक्षा भीषण असलेल्या या दुष्काळाची तीव्रता जाणुन राजकारण करावे, ऐन पावसाळ्यात माणवासियांना कडक  उन्हाळ्याचा दिवसभर सामना करावा लागतो आहे, तर पहाटे व रात्रीची बोचरी थंडी पडत असल्याने बळीराजा पुढे अनेक प्रश्न आ$$$ वासुन उभे राहिल्याने अनेक युवक आधिच कामाधंद्याला मुंबई, पूणे ,हैदराबाद, वसई, बेगलोर आदी शहरात गेला होता. या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्याने शेतीचे उत्पन्न दोन्ही हंगामात न झाल्याने पाण्याबरोबर यावर्षी अन्नधान्य व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही मोठा  बनला असल्याने धुळदेव, हिंगणी, मासाळवाडी, कारखेल ,पर्यती,भाटकी, संभुखेड, वाकी-वरकुटे, दिवड, वडजल, कुकूडवाड, वळई,पालवण, जांभुळणी,पुळकोटी, गंगोती, देवापुर ,शिरताव,पळसावडे, काळचौडी, वळकुटे-मलवडीसह म्हसवड पालिका हद्दीतील बेघर वसाहत ,लोंखडेपाटी, विरकरवाडी ,बनगरवाडी, आण्णाभाऊ साठेनगरमधील हजारो कुटुंबे ऊसतोडीला गेल्याने अर्ध्या माणवासियांची दिपावलीची पहिली आंघोळ ऊसाच्या फंडावर तर शेळ्या-मेंढरे चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचे दिवाळीचे अभ्यंगस्नान व भाऊबीज गावापासुन मैलोनमैल दूर रानात दुष्काळच्या छायेने झाली.
जनावरांना ओला चारा नसल्याने पावसाळ्यापर्यंत जनावरांना चारा साठवून ठेवण्यासाठी शेतकरी वाळलेला कडबा,  वैरणीच्या शोधासाठी धडपड करत असताना दिसत असून ओली वैरणीची सहा ताटाची पेंडी पंधरा रुपये झाली, तर वाळलेली वैरण कडबा शेकडा दर आठराशे ते दोन हजारवर गेला आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची भिती शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे.
     .
   सध्या माणच्या बळीराजाप्रमाणे व्यापारी व अनेक व्यावसायिक यांनाही दिवाळी दुष्काळीत गिऱ्हाईकाची वाट पहात बसावे लागले.व्यापारपेठा माणूस नसल्याने निर्मनुश्य झाल्या. ग्रामीण भागात व खेडोपाडी घरे आहेत, पण वाडीत माणूस नाही, शेती आहे, पिके नसल्याने शेती ओसाड झाली आहे. विहीर आहे, पण पाणी नसल्याने मोकळी पडली आहे.  जनावरांचा गोटा आहे, पण जनावरांना दोन महिण्यापासून चाराच नसल्याने अनेकांनी कसाबाच्या हावाली आपली जनावरे करून ऊसतोडीची उचल घेवून वर्षेभरातील शेतीसाठी घेतलेले खत विक्रेत्याचे , सावकाराचे पतसंस्थेचे व सोसायटीची बाकी भागवून पुढील वर्षाच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी सहा महिने भटकंतीसारखे फिरण्याची वेळ, पावसाच्या लहरीपणामुळे व राजकर्त्याच्या नकर्तैपणामुळे ,     माणचा पाणी प्रश्न भिजत ठेवल्यानेच बळीराजावर आली आहे. यावर्षी १९७२ पेक्षा मोठा अन्नधान्य व चारा टंचाईच्या दुष्काळावर सरकारने दुष्काळऐवजी दुष्काळजन्य परिस्थितीच्या शब्दप्रयोग करुन दुष्काळी जनतेच्या तोंडचे पाणी पळवून शेतकऱ्यांच्या हातात नक्की मदत किती? हा येणारा काळच ठरवणार आसला तरी या वर्षाच्या दुष्काळी संकटातुन बळीराजा सरकार सोडवणार कि बळीराजाला संकटात टाकणार याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise