विकास मोरे-पाटील यांना वाढदिवसानिमित्त दि. १९ रोजी गाडी प्रदान सोहळा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 17, 2018

विकास मोरे-पाटील यांना वाढदिवसानिमित्त दि. १९ रोजी गाडी प्रदान सोहळा

विकास मोरे-पाटील यांना वाढदिवसानिमित्त
 दि. १९ रोजी गाडी प्रदान सोहळा
माणदेश न्यूज नेटवर्क
दिघंची/वार्ताहर: दिघंचीचे युवा नेते विकास मोरे-पाटील यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त दि. १९/१०/१८  रोजी सायं५.०० वा. त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल दादा मोरे-पाटील, उपसरपंच सौ. तेजश्री विकास मोरे-पाटील हे आहेत.
तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जि.प. माजी सदस्य जनार्दन झिंबल, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पुजारी, आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील, शिवसेनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, पुजारवाडी दिघंची चे युवा नेते ब्रह्मदेव होनमाने, राजेवाडी चे युवा नेते पांडुरंग कोडलकर, दिघंची ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मारुतीदादा भोसले, प्रतिष्ठित व्यापारी माणिककाका नष्टे, कैलास गोटे, पळसखेल चे सरपंच दादासाहेब कुचेकर, करगणी चे माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे, खरसुंडी चे माजी उपसरपंच अर्जुन पुजारी, पळसखेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व युवा नेते बबलू पवार, झरेचे नेते बंडूशेठ कातुरे, शहाजी जाधव, दिघंची ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, युवा नेते ऋषिकेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य जहांगीर उर्फ मुन्ना तांबोळी, सागर ढोले, प्रणव गुरव, जितेंद्र मोरे-पाटील, नानासाहेब जावीर, राहुल पांढरे, करगणी चे सरपंच गणेश खंदारे, गळवेवाडी चे बाळासाहेब पाटील, डॉ.मनोजकुमार जरे, खानजोडवाडी चे सरपंच रामदास सूर्यवंशी, विठ्ठलापुरचे उत्तम बाड, शेखर मिसाळ, बाळासाहेब मोटे, गौरीशंकर भोसले, मनोज मेनकुदळे, विठ्ठल बुधावले, बाळासाहेब बाड, कैलास देवडकर, मुढेवाडीचे सरपंच अनिल मुढे, बाळासाहेब पाटील, उंबरगावचे सरपंच शिवाजी कुचेकर, मुढेवाडीचे माजी सरपंच मोहन मुढे हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजक राजू अर्जुन, यश मोरे, संदीप कवडे, योगेश नष्टे, कैलास पिसे, सिद्धेश्वर पाटोळे, गणेश मोरे, प्रसाद कुलकर्णी, अफजल मुलाणी, प्रतिक वाघमारे, संदीप कोळी, अमोल पवार, राजेंद्र जामदार, विश्वनाथ त्रिगुणे, पिनु जवळे, सुनील औंधकर, गब्बर शेख, संदीप मोरे, मधुकर ठोंबरे, सखाराम मोरे, आण्णा मोरे, राहुल मोरे, विश्वास पुसावळे, संभाजी बाड, समाधान मोरे, संपत माने, नवनाथ जाधव, मोहन रायजादे, संभाजी मोरे, राजू गायकवाड, कुबेर सावत, नितीन साळुंखे, तसेच सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ दिघंची, श्री शिवप्रतिष्ठान दिघंची, जवान रॉयल्स तरुण मंडळ, दिघंची व एसएससी बॅच 1997 यांनी संयोजन केले आहे.
 सदरचा कार्यक्रम महादेव मंदिर दिघंची या ठिकाणी सायंकाळी ५.०० वा. संपन्न होणार असल्याने सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise