युवा नेते प्रशांत लेंगरे व उद्योजक तेजस लेंगरे यांची दै. माणदेश एक्सप्रेस ऑफिसला भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 17, 2018

युवा नेते प्रशांत लेंगरे व उद्योजक तेजस लेंगरे यांची दै. माणदेश एक्सप्रेस ऑफिसला भेट


युवा नेते प्रशांत लेंगरे व उद्योजक तेजस लेंगरे यांची दै. माणदेश एक्सप्रेस ऑफिसला भेट
माणदेश न्यूज नेटवर्क  
आटपाडी/वार्ताहर : पलूस शिवसेना तालुका प्रमुख, जननायक प्रशांतदादा लेंगरे व युवा उद्योजक तेजस लेंगरे यांनी दैनिक माणदेश एक्सप्रेस कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा दैनिक माणदेश एक्सप्रेस च्या वतीने फेटा बांधून व सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक दिपक प्रक्षाळे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राहुल सपाटे, युवा नेते रणजीत ऐवळे उपस्थित होते. 

यावेळी प्रशांतदादा लेंगरे यांनी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कडेगाव-पलूस मतदार संघातून येणारी विधानसभा पूर्ण ताकदीने लढणार आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेने मार्फत विकासाचे विविध मुद्दे हातामध्ये घेतले आहेत. पक्षाच्या वतीने मतदार संघात जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून मतदार संघासाठी विकासाच्या योजना कार्यान्वित करणार आहे. जनतेच्या प्रश्नांची दाखल घेवून त्यांना सुकर जीवन जगता यावे यासाठी या भागात शिवसेना प्रयत्नशील आहे. सरकार मधील घटक पक्ष म्हणून सरकारच्या माध्यमातून लोकांची कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी ही पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार विकासच्या योजना आखताना या मतदार संघाकडे त्याचे लक्ष वेधत आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक तेजस लेंगरे म्हणाले तरुणांनी नोकरांच्या मागे न लागता आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याकडे लक्ष द्यावे. व्यवसाय प्रशिक्षण घेवून त्यामध्ये प्रविणता मिळवावी व त्याचा उपयोग अर्थाजनासाठी करावा. उपजिवेकेसाठी नोकरीच्या भीक मागण्यापेक्षा तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकावे. कोणताही उद्योग करताना श्रमासाठी लाजु नये. 

1 comment:

Advertise