Type Here to Get Search Results !

वडियेरायबाग येथील दारूअड्डे उद्ध्वस्त करू : जि.प.सदस्या रेश्माताई साळुंखे


वडियेरायबाग येथील दारूअड्डे उद्ध्वस्त करू : जि.प.सदस्या रेश्माताई साळुंखे दारूबंदीसाठी महिला आक्रमक
माणदेश न्यूज नेटवर्क 
कडेगाव/प्रतिनिधी : वडियेरायबाग (ता.कडेगाव) येथे होणारी अवैध दारु विक्री चार दिवसांत बंद झाली पाहिजे, अन्यथा महिलांना सोबत घेऊन दारू अड्डे उध्वस्त करू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या रेश्माताई साळुंखे यांनी दिला.
गावात होत असलेली अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पती आणि मुलगा दारु पित असल्याने कुटुंब उदध्वस्त होत असल्याचे सांगताना अनेक महिलांना रडू कोसळले. यावेळी अवैध दारूबंदी शासकीय समिती सदस्य सुनील मोहिते, सरपंच स्वाती सराटे,   ॲड. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
रेश्माताई साळुंखे म्हणाल्या, वडियेरायबाग येथे होत असलेली अवैध दारू विक्री शासकीय यंत्रणेने डोळेझाक केल्याने होत आहे. येथील दारू विक्री बंद झाली पाहिजे, यासाठी महिला गेले वर्षभर प्रयत्न करत आहेत. महिला आणि ग्रामस्थांनी तक्रार करून ही जर पोलीस आणि प्रशासन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही महिलांना सोबत घेऊन दारूअड्डे  उदध्वस्त करू. तहसिल कार्यालयासमोर ठिय्या मारून आंदोलन करू. माझ्या मतदारसंघात अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे सांगितले.
अवैध दारू बंदी शासकीय समिती सदस्य सुनील मोहिते म्हणाले, गावात राजरोसपणे दारूविक्री होत आहे. ही बाब संतापजनक आहे. दारूमुळे गाव व्यसनाधीन बनत आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांनी ताबडतोब दारुविक्री बंद करून अन्य व्यवसाय सुरू करावेत. अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करून अवैध दारूविक्री बंद करू.
यावेळी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच प्रकाश पवार, रेखा इनामदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गायकवाड, सोसायटीचे अध्यक्ष सुखदेव जगताप, वैशाली शेळके, शुभांगी कोळेकर, प्रतिभा वाघमोडे, राखी पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies