नगराध्यक्ष यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

नगराध्यक्ष यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी


नगराध्यक्ष यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी
माणदेश न्यूज नेटवर्क 
कडेगांव/प्रतिनिधी : कडेगाव नगरपंचायतीला आलेला 1 कोटी चा निधी हा नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत निधी आला असून नगराध्यक्षा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नेत्याची व्हा-व्हा मिळावी म्हणुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः दिलेला निधी आपल्या नेत्याने दिला आहे असे दाखवून जनतेची दिशाभूल चालू केली आहे. हे थांबवावे व लोकांचा चुकीची माहिती देणे बंद करावे असे भाजपाचे विरोधी पक्षनेते उदयसिंह देशमुख प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. 
महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने व या विभागाचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांनी हा निधी दिला आहे. विनाकारण जनतेपुढे वगळे चित्र मांडले जाते.    नगरपंचायत मध्ये चुकीची कामे चाललेली आहेत त्याकडे त्यांच्या नेत्यांनी डोळे झाक करावे म्हणुन नेत्याचे नाव घेऊन नेत्याची प्रशंसा करत आहेत. त्यांनी नगरपंचायत प्रशासन यांच्याकडून नीट माहिती घ्यावी की, निधी कोणी दिला आहे व यापुढे माहिती घेऊन बोलावे असे म्हणाले. 


No comments:

Post a Comment

Advertise