Type Here to Get Search Results !

आटपाडी : भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने केले लंपास



आटपाडी :  भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने केले लंपास केल्याची घटना आटपाडी-मासाळवाडी रोड वरील गवरचिंचमळा येथील संभाजी पाटील यांच्या घराशेजारी घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी कमल सरगर वय ६५) या शेतातील काम करून गवरचिंच मळा येथून मासाळवाडीकडे पायी चालत घरी निघाल्या होत्या. गवरचिंचमळा येथील संभाजी पाटील यांच्या घरासमोर त्या आल्या असताना एक अज्ञात इसम मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आला.


त्यांच्या गळ्यातील २१ हजार रुपये किमतीच्या सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र व सुमारे १८ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ असे ३९ हजार रुपये किमतीच्या दागिन्याची चोरी करून तो मासाळवाडी गावच्या दिशेने पळून गेला. सदरची घटना ही दिनांक २४ रोजी दुपारी १२.३० वा. घडली. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies