Type Here to Get Search Results !

राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले ; गांजाला दिला औषधाचा दर्जा

 



राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले ; गांजाला दिला औषधाचा दर्जा 



नवी दिल्ली : राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. बुधवारी हा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने घेतला आहे.



यासाठी झालेल्या मतदानात गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी २७ देशांनी समर्थन दिले तर याविरोधात उर्वरित देशांनी मतदान केले. विशेष म्हणजे भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ यावेळी मतदान केले. तर, विरोधात चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी मतदान केले. या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.



गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. अनेक देश या निर्णयानंतर गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. सध्या गांजाचे वैद्यकिय महत्त्व ५० पेक्षा जास्त देशांनी समजून घेत गांजाला वैध ठरवले आहे. वैद्यकिय कारणासाठी कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये गांजाला परवानगी देण्यात आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies