Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या या नेत्याला मिळाला लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज




 शिवसेनेच्या या नेत्याला मिळाला लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज


मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. 



संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याचा त्रास पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोन स्टेन हृदयात टाकण्यात आले आहेत. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्त्वाखाली संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies