Type Here to Get Search Results !

ओबीसी आरक्षण मोर्चाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात




 ओबीसी आरक्षण मोर्चाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात



पुणे : पुण्यात ओबीसी आरक्षणच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र त्यांच्या मोर्चाला पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात आली नव्हती. तरी मोर्चा काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.




ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘जय ज्योती जय संविधान’ यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. 




या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी नव्हती. तरी मोर्चेकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने समीर भुजबळ, रूपाली चाकणकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर आंदोलनामुळे शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies