Type Here to Get Search Results !

पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा : राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

 



पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा : राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी



पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे. 



दरम्यान, अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.



कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे  यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर होते. या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.



या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटलांनी भाजपच्या पाटलांना पराभूत केले, असे म्हटले जात आहे.‘विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज













टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
B.J.P. Means R.S.S. RASHTRAVADI mean सामान्य जनता. मनुवादी प्रसार हद्दपार होणे गरजेचे आहे, त्यामुळे देश एकसंघ होण्यास मदत होईल.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies