“हे नेलकटरलाही घाबरतात पण वार्ता तलवारीच्या करतात” : निलेश राणें - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

“हे नेलकटरलाही घाबरतात पण वार्ता तलवारीच्या करतात” : निलेश राणें


“हे नेलकटरलाही घाबरतात पण वार्ता तलवारीच्या करतात” : निलेश राणें

 


मुंबई  :  शिवसेना  नेते, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांना वंदन करण्यात येत आहे. शिवाजी पार्क येथून खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना भाजपावर टीका केली. तसेच, हिंदुत्वासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज आम्हाला नसल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या विधानावर भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला. संजय राऊत यांच्या, गरज पडल्यास जिथं तिथं हिंदुत्वाची तलवार घेऊन शिवसेना हजर राहिल या वाक्यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊत हे नेलकटरलाही घाबरतात पण वार्ता तलवारीच्या करतात, अशा शब्दात निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise