लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी असतानाही संत सावता माळी पतसंस्थेचे आर्थिक प्रगती चांगली : हर्षवर्धन देशमुख ; सभासदांना १० टक्के लाभांश वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 2, 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी असतानाही संत सावता माळी पतसंस्थेचे आर्थिक प्रगती चांगली : हर्षवर्धन देशमुख ; सभासदांना १० टक्के लाभांश वाटप
लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी असतानाही संत सावता माळी पतसंस्थेचे आर्थिक प्रगती चांगली : हर्षवर्धन देशमुख ; सभासदांना १० टक्के लाभांश वाटप 

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : संत सावता माळी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभासदांना दिवाळी सणासाठी 1 किलो साखर 1 किलो दाळचे वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे व अॅड शहाजी कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हर्षवर्धन देशमुख म्हणाले, कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे बाजारपेठत आर्थिक अवस्था वाईट असतानादेखील पतसंस्थेने आर्थिक प्रगती चांगली केली आहे. तर चेअरमन बाबासाहेब माळी म्हणाले, पतसंस्थेच्या ठेवी 7 कोटी 35 लाख आहेत. कर्जवाटप 8 कोटी 50 लाख आहे. वसूल भाग भांडवल एक कोटी 40 लाख, नफा 34 लाख 35 हजार झाला आहे. सन 2019 ते 2020 या आर्थिक सालात सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे.व्हा. चेअरमन तुळशीराम बालटे म्हणाले, दिघंची येथे सुविधा केंद्र आहे. तेथे शाखा मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. निंबवडे येथे लवकरच शाखा करून ग्राहकांची सोय केली जाईल. मॅनेजर तुकाराम जाधव म्हणाले, पतसंस्थेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे.
प्रारंभी संत सावता माळी, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक माजी उपसभापती भागवत माळी यांनी तर नानासाहेब माळी यांनी स्वागत केले. यावेळी संचालक बाबुराव फुले, नानासो अनुसे, पांडुरंग बालटे, संभाजी लिंगे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा माळी, स्वाती देशमुख, लक्ष्मी बालटे, विजय पाटील, मापटेमळा सरपंच रघुनाथ माळी, सदस्य भीमराव सातारकर, विजय माळी, श्रीरंग शिंदे, सर्जेराव राक्षे उपस्थित होते.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise