Type Here to Get Search Results !

'वेलकम एकनाथ खडसे साहेब' : रोहित पवार




 'वेलकम एकनाथ खडसे साहेब'  : रोहित पवार 


मुंबई : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खास शैलीत ट्विट करत खडसेंच्या निर्णयाचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अत्यंत मार्मिक ट्वीट केले आहे. निसर्गाचा नियम सांगत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  


'राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,' असं सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. 'वेलकम एकनाथ खडसे साहेब' असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात जोरदार स्वागत केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies